जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन-जळगाव शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी होस्टेलवर राहणा-या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. मला सिल्व्हर पॅलेस हॉटेलवर भेटायला ये असे सतत फोन करुन विद्यार्थिनीला एका तरुणाने हैराण केले आहे.
विद्यार्थीनीस त्रास देणा-याने काही एक कारण नसतांना विद्यार्थीनीला तब्बल 31 वेळा फोन करुन तिचा बुलेटने पाठलाग करुन तिला त्रास दिला. या घटने प्रकरणी विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एक विद्यार्थीनी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत एका होस्टेलमधे राहण्यास आहे. तिच्या मोबाईलवर रविंद्र खेडकर नावाच्या तरुणाने फोन करुन तिला हॉटेलवर भेटायला येण्यास म्हटले. (The young man called and asked her to meet him at the hotel)
त्यानंतर रात्री दोन ते साडे तीन वाजेच्या सुमारास 31 वेळा फोन केल्याने विद्यार्थीनी वैतागली. याशिवाय तिचा बुलेटने पाठलाग करुन विनयभंगाचा प्रकार सुरुच होता. या घटनेचा पुढील तपास हे. कॉ. सुनिल पाटील करत आहेत.