भारताच्या मुख्य भूमीवर मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पावसाळ्याचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आणि डोंगर दऱ्यांतून कोसळणाऱ्या धबधब्यांचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अनेकांची लगबग सुरु झाली असणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध धबधबे तुम्हाला माहित असतील मात्र भारतात काही असे धबधबे आहेत, जे पाहिल्यावर तुम्हालाही या धबधब्यांना एकदा तरी भेट द्यावीशी वाटेल.
1) दुधसागर धबधबा (गोवा) : दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र फेसाळत वाहणारा धबधबा आणि त्यातून जाणारी रेल्वे… वाह.. दुधसागर धबधबा पाहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दुधसागर धबधबा हा मनडोवी नदीपासून तयार होतो. या धबधब्याची उंची जवळपास 1020 फूट आहे
2) जोग धबधबा (कर्नाटक) : कर्नाटकातील जोग या धबधब्याचे राजा, रोअरर, राणी आणि रॉकेट असे या धबधब्याचे चार प्रवाह आहे. हा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर स्थित आहे. या धबधब्यातील पाणी 250 मीटर उंच टेकडीवरुन खाली पडतानाचे दृश्य विंहगम असते.
l3) चित्रकूट धबधबा (छत्तीसगड) : छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आहे; ज्यास भारताचा नायगारा म्हणतात. हा धबधबा 29 मीटर उंच आहे.
4) वजहाचल धबधबा (केरळ) : केरळच्या चालकुंडी नदीवर स्थित असलेल्या वजहाचल धबधबा चारही बाजूंनी झाडाझुडुपांनी वेढला आहे. तसेच ज्या नदीतून हा धबधबा प्रवाहीत होतो, त्यात जवळपास 90 प्रकारचे मासे आढळतात.
5) तालकोना धबधबा (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री वेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे. हा धबधबा तिरुमालाच्या पर्वतरांगामध्ये वसला आहे. याची उंची 270 फूट आहे.