मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.