अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन- तालुक्यातील शिरूड येथे आधी मुलाला गळफास लावून नंतर आईनेही आत्महत्या केल्याची घटना 17/6/2022 रोजी घडली. सदर घटना ही आत्महत्या नसून माझ्या आई- वडिलांनी माझ्या बहिणीचा व मुलाचा खून केला आहे. असा आरोप करीत खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मृत व्यक्तीची मोठी बहीण रिंकू बिऱ्हाडे यांनी केली आहे.
शिरूड येथील माहेर असलेल्या पूर्वी सोनवणे यांचा सासरी वाद सुरू होता. त्यामुळे पूर्वी सोनवणे या मुलगा वृषांतसोबत चार वर्षांपासून माहेरी आई- वडिलांकडे वास्तव्याला होत्या. गुरुवारी मध्यरात्री पूर्वी सोनवणे हिने मुलाला गळफास दिल्यानंतर स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केली. 17 रोजी सकाळी दोघांनी गळफास घेतलेल्या प्रकार समोर आला. पूर्वी सोनवणे हिच्या आई-वडिलांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती तत्काळ पोलीस स्थानकाला देण्यात आली. पोलिसांनी पाहणी करून मृतांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
हत्या की आत्महत्या?
सासरी कौटुंबिक वाद असल्याने
पूर्वी सोनवणे मुलांसोबत माहेरी राहत होती. आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वींने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समजते. मात्र या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे. याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे ही हत्या होती की आत्महत्या अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.
आई-वडिलांनी ठार मारल्याचा आरोप
लहान बहिणी पूर्वी व तिच्या मुलाला माझ्या आई-वडिलांनीच ठार मारले आहे. याघटनेस आत्महत्या दाखवून ही बाब लपविण्यात येत आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत पूर्वीची मोठी बहीण रिंकु जगदिश बिर्हाडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे ०९/०६/२३ शुक्रवारी निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी दिपक सोनवणे व तीचा मुलगा ऋशांत यांचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या दोघांना माझ्या आई वडिलांनीच ठार केले आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. दरम्यान, यासंदर्भात रिंकु बिर्हाडे यांनी अमळनेर पोलिसांना देखील २ ऑगस्ट २०२२ , १९ ऑगस्ट २०२२ व २४ नोव्हेंबर २०२२ रोजी रितसर अर्ज दिला आहे. मात्र, संबंधित पोलीस अधिकारी व शासकीय यंत्रणेकडून अद्यापही न्याय मिळालेला नाही. याप्रकरणात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणारे पोलीस अधिकार्यांना व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रिंकू बिराडे यांनी केली आहे.
रजनीकांत पाटील- मुख्य संपादक: (पोलीस वृत्त- न्युज)