चोपडा: प्रतिनिधी रवींद्र कोळी- वर्दी येथील ग्रामपंचायतला महाराष्ट्र शासनाच्या प्रआयो2019/प्र. क्र 256/यो 10 ग्राम विकास विभाग बांधकाम भवन मुंबई या आदेशानुसार, ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्याची कार्यवाहीचे आदेश होते .तसे आदेश प्रत वर्डी ग्रामपंचायतला 25 जानेवारी 2019 ला दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतने डिसेंबर 2019 अखेर गावठाण गट नंबर6/1 मधील 300 पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमाकुल करण्यात आली आहे .परंतु ती सर्व अतिक्रमणे नियमाकुल प्रकरणे शासनाच्या आदेशाच्या अटी शर्ती व नियमांना डावलून नमुना नंबर आठ ला नावे नोंद झाल्याचा, माहितीच्या अधिकारात विचारलेल्या उत्तरात माहिती समोर आली आहे.
मार्तंड शंकर कोळी यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती अतिक्रमे नियमानुकुलसाठी 2017 ते 2020 कालावधी ग्राम सभेची मान्यतेच्या ठराव तसेच रहात असलेल्या अतिक्रमित जागा नावे होण्यासाठी मागणी अर्ज किंवा त्याचे विवरण पत्राची झेरॉक्स प्रति आदी माहिती मागितली असता 2017 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमित गावठाण जमिनी बाबत कोणतेही ग्रामसभेत ठराव झालेला नाही , अंगठा किंवा सही नसलेले अतिक्रमण धारकाचे विवरण पत्राची झेरॉक्स प्रति, असे लिखित उत्तर जन माहिती अधिकारी व ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांनी दिले. परंतु शासकीय आदेशात स्पष्ट आहे की अतिक्रमण स्थळाची पाहणी, वाद विवाद नसावी ,यादी तयार करून यादीला ग्रामसभेच्या मंजुरी ठरावानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीसाठी पाठवावे असा स्पष्ट उल्लेख असतानाही कुठलीही शासकीय प्रोसिजर पूर्ण न करता अतिक्रमण धारकांना अंधारात ठेवून नमुना आठ ला नोंदी करण्यात आल्या. ग्रामसभा न घेता, लोकांची मते जाणून न घेता, एकाधिकार वापरून तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी व बेजबाबदार भ्रष्टाचारी मार्गाने नोंदी झाल्याचे दिसून येत आहे .अशा शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी अंतिम निर्णय घेण्याची मागणी वर्डी ग्रामस्थांनी केली आहे.
*आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी जागा सापडेना*
जिल्हा परिषद मालकीची आरोग्य उप केंद्राची मालमत्ता क्रमांक13 32 ची व सभोवताली असलेली जागा ग्रामपंचायत ने सन. 2018 ला न.न. आठला भोगवटादार म्हणून नोंद केली आहे तर काहींचे त्या जागेवर घरकुल बांधली गेली आहे. नवीन आरोग्य उपकेंद्राला मंजुरी झालेली असूनही त्यासाठी जागा सापडत नाही व बांधकामाचा मूर्त ही सापडत नाही, म्हणजेच ग्रामपंचायतची स्थिती धरले तर चावते, सोडले तर पडते .अशी अवस्था झालेली आहे.
5/6/2023