अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – दि.९ रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात दि.१० रोजी सकाळी ११.०० वाजेपासून ते १२ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत संचारबंदी (curfew) लागू करणेत आली आहे. अमळनेर शहरात रात्री दंगल सदृश (curfew) परिस्थिती निर्माण झाली असून शहरात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे तेढ निर्माण होऊन दोन समाजातील लोक आपसात भिडले असून दुकानाची तोडफोड तर अनेक घरांवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे कलम १४४ अन्वये शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी (curfew) काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.
अमळनेर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे बाबतचे गांभिर्य लक्षात घेता, वेळे अभावी संबंधितांना पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने फौजदारी प्रकीया संहिता १९७३ चे कलम १३४ मधील प्रक्रिया पुर्ण करता येत नसल्याने कलम १४४ (२) (curfew) अन्वये हा आदेश एकतर्फी लागू करण्यात येत आहे. सदरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था/ संघटना यांचे विरुध्द प्रचलित कायद्यात नमुद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल.
सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी. कर्मचारी, पोलिस, रुग्णसेवा, दुध व पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच शहरातील सरकारी/खाजगी बँक/ पतसंस्था, विवाह व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.


