स्वराज्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जून 1674 मध्ये राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकामुळे मराठी माणसाला चेतना नवी मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजी महाराजांंनी छत्रपती हे पद धारण केले.
राज्याभिषेक केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. पण तुम्हाला शिवाजी महारांच्या या पहिल्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण-कोणते मावळे होते, माहिती आहे का?
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ :
1) पंतप्रधान (पेशवा) सर्वोच्च मंत्रीपद – मोरोपंत त्रिंबक पिंगळे
2) पंत अमात्य (मजुमदार) – रामचंद्र नीळकंठ
3) पंत सचिव (सुरणीस) – अनाजीपंत दत्तो
4) मंत्री (वाकनीस) – दत्ताजी पंत त्रिंबक
5) सेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते
6) पंत सुमंत (डाबिर) – रामचंद्र त्रिंबक
7) न्यायाधीश – निराजपंत रावजी
8) पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – मोरेश्वर पंडित.
एकंदरीत, मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.