*जळगाव दि.५ प्रतिनिधी* – कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय उभारणीसाठी ‘बीजभांडवल’ उपलब्ध करून देणे ह्या तीन प्रकारे फाली विद्यार्थ्यांना मदत करत असते. विज्ञान, तंत्रज्ञानासह कृषिअभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे. यातुन ॲग्रिकल्चर इंजिनियर तयार होऊन कृषी क्षेत्राला व्यावसाईक रूप देतील व शेतीतील नैराश्य नक्कीच कमी होईल, अशा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा फालीचे चेअरपर्सन अनिल जैन यांनी व्यक्त केला.
गोदरेज अॅग्रोवेटचे कार्यकारी संचालक बुर्जीस गोदरेज यांनी फालीतील विद्यार्थ्यांचे कौतूक केले. संशोधक वृत्ती, जिज्ञासा व परिश्रम हे तिन्ही गुण फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर अर्थात फालीतील विद्यार्थ्यांजवळ असल्याचे सांगितले. फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांनी फाली उपक्रमांच्या फलश्रुतीबद्दल सविस्तर सांगितले. महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये सुरू असलेला फाली उपक्रम आता पुढील टप्प्यात मध्यप्रदेशमध्येही विस्तारीत केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्यात.
फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोप सत्रावेळी बोलत होत्या. यावेळी ५५ संशोधन यांत्रिकी मॉडेल व व्यवसाय योजना यांचे सादरीकरण जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर विद्यार्थ्यांनी केले.
पारितोषिक वितरणाप्रसंगी अथांग जैन, मोहित व्यास, जी. चंद्रशेखर, अंजिक्य तांदळे, सबोरणी पोद्दार, अजय तुरकाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. फालीचे माजी विद्यार्थी शिवम शेलार, रोहन रणवरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्यावतीने श्रावणी गोलादे, अक्षरा देसले, भुषण लाहिटकर, संस्कृती काकोणे, सोहम पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले.
यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडस लि. संचालक अथांग जैन व प्रायोजित कंपन्यांचे परीक्षक असलेल्या सदस्यांनी यांनी पाहणी केली. एकात्मिक शेती पध्दत, पिक संरक्षक एके-47, सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅक्टर, सायकल वापरून ज्यूस तयार करणे, मल्टीपर्पज कृषीअवजारे यासह अनेक भन्नाट संशोधनात्मक यंत्रे विद्यार्थ्यांनी सादर केली होती.
*संशोधनामुळे शेती समृध्द होऊ शकते- अशोक जैन*
विद्यार्थ्यांनी सादर केलेले यंत्र बघितल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले की, ‘शेती, शेतकरी ज्या अडचणींना सामोरे जात आहेत त्यावरील उपाययोजना म्हणून विविध संशोधक मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात एक रोबोट आठ प्रकारची कामे करू शकतो, मजुरीवरील खर्च कमी होणारी उपकरणे यासह अन्य उपकरणे ती कृषिक्षेत्राला समृद्ध करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
*शेतीला सन्मान मिळावा – अतुल जैन*
शेतीला सामाजिकस्तरावर उद्योग म्हणून बघितले पाहिजे. आयटी, मॅकेनिकल इंजिनियरपेक्षा किंवा त्या दर्जाचे उत्पन्न शेतकऱ्यांचे असले पाहिजे. शेतीकडे सुशिक्षित पिढी वळली पाहिजे. शेतकरी मुलांसोबतही आयुष्य चांगले जाईल, हा विश्वास निर्माण व्हावा यासाठी फालीसारखे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.
*दुसऱ्या सत्राचे कृषी बिझनेस व इन्होव्हेशन्सचे सादरीकरण*
फालीच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५५ बिझनेस मॉडेल्सचे प्रभावी सादरीकरण केले. त्यात नीम तेल व पावडर, शेतातील पाचटापासून बायोडिग्रेडेबल प्लेट, बाऊल बनविणे, मश्रुमचे उत्पादन, इको फ्रेंडली बोरवडी, संत्राचे विविध उत्पादने, तृणधान्यांपासून स्नॅक्स, ह्युमिक अॅसिड बनविणे, चिंच व त्याचे बाय प्रॉडक्ट, कवठाचे उत्पादन व त्यापासून विविध पदार्थ, गोट फार्मिंग, पोल्ट्री, ऊसाचे विविध उत्पादने, मधमाशीपालन, केळी चिप्स, कांदा व त्याचे विविध पदार्थ, गायीच्या शेणापासून विविध उत्पादने, अॅग्रोटुरिझम, कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पिरूलिना म्हणजे शेवाळची शेती हा नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडल विद्यार्थ्यांनी सादर केले.
*दोघंही स्पर्धांमध्ये हे होते परीक्षक*
या दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून गोदरेज अॅग्रोवेटचे बुर्जिस गोदरेज, मोहित व्यास, यूपीएलचे अजिंक्य तांदळे, प्रदीप पाटील, अमूलचे डॉ. जे. के. पटेल, डॉ. बी. एम. भंडारी, जैन इरिगेशनचे डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, किशोर रवाळे, ओमनिओरचे सबोरणी पोद्दार, उज्जीवन स्मॉल फायनान्स रोहीत पाराशर, आयसीआयसीआय फाऊंंडेशनचे अनुज अग्रवाल, दीपक पाटील, मोनिका आचार्य, रॅलिज इंडियाचे अजय तुरकाने, सुचेत माळी, महेंद्राचे डॉ. शुभम, स्टार अॅग्रीचे विशाल पाठक, जी. चंद्रशेखर, अॅक्सीस बँकेचे मनिष साळुंखे, किरण नाईकवडी या सदस्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
*बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे* –
ब्लॅक सोल्जर फाय फार्मिंग, शारदाबाई पवार विद्यानिकेतन अॅण्ड डे स्कूल, बारामती, पुणे (प्रथम क्रमांक), सोया प्रॉडक्ट ज्ञानसागर निवासी शाळा, अष्टी जि. यवतमाळ (द्वितीय), मका कुट्टीपासून बायोडिग्रेडबेल प्लेट व बाऊल बनविणे जिजामाता विद्यालय साखरखेडा जि. बुलढाणा (तृतीय), स्पिरुलिना शेती, कन्या विद्यालय सामोळे जि. धुळे (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक अॅग्रीस्टार न्युट्रीशेन, पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा ता. चोपडा जि. जळगाव
*इनोव्हेशन स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे* –
एअर कंडीशन ओनियन स्टोअर हाऊस, खान्देश गांधी बाबुभाई मेहता विद्यालय कासरे जि. धुळे (प्रथम), अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज रोबोट, न्यू इंग्लीस हायस्कूल मोहपा जि. नागपूर (द्वितीय), मल्टीपर्पज सोलार ट्रॅक्टर, एस. एस. पाटील विद्यामंदीर, चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव (तृतीय), UV-C किरण वापरून फळे आणि भाज्यांचे निर्जंतुकीकरण, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू जि. अकोला (चतुर्थ), शेतकऱ्यांची जीवनरक्षक काठी, एस. एम. हायस्कूल, खेडगाव जि. नाशिक यांचा पाचवा क्रमांक आला.