अमळनेर : पोलीस वृत्त न्युज तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडीचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मयत तर चार जण जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी , लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व केवाराम पावरा वय २५ असे तिघे मयत झाले आहेत. चार जण जखमी आहेत. टॅक्सी मधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार रा सुरत याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत.
चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्स चे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एल ८६९३ व आणखी एका मोटरसायकल वर ट्रीपलसीट चोपडयाकडे निघाले होते. चोपद्याकडून टॅक्सी क्रमांक एम एच १९ वाय १८२८ येत होती. टॅक्सी मध्ये १२ जण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोटारसायकलीची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले होते. तर दोन्ही मोटारसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या त्यात दोघे जण जागीच ठार झाले एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले.