दहावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार? याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. आता याची प्रतीक्षा संपली असून दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या म्हणजे 2 जूनला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
SSC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता शिक्षण विभागाच्या ssc.mahresults.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
याशिवाय mahresult.nic.in किंवा sscresult.mkcl.org या वेबसाईटवर देखील विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकता.
एकंदरीत, राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. तसेच ही परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.