जळगाव: महाराष्ट्रात गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत असून बँक दरोड्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. अशातच जळगावात आज बँक दरोड्याची एक मोठी बातमी घडलीय.
जळगाव शहरातील कालींका माता मंदिर परिसरामधील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा टाकला आहे. शस्त्राच्या बळावर भरदिवसा हा दरोडा टाळून अंदाजे 15 ते 17 लाखांपेक्षा रूपयांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
जळवात शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून आज बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले.
त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. याप्रसंगी त्यांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकडे लांबवून पलायन केले.
दरोडेखोरांनी बँकेतील अंदाजे 15 ते 17 लाख रुपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या ठिकाणी एसपी एम. राजकुमार, अपय अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांसह भेट दिली असून श्वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.