गेल्या काही दिवसांपासून उन्ह्याचा पारा वाढतच चालला आहे. अशातच आता हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. पुढच्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबईत देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.