जळगाव – चोपड्याचे आमदार लता सोनवणे यांच्या गाडीला भरधाव रेतीचे रिकाम्या डंपरने जोरदार धडक सुदैवाने आमदार लता सोनवणे यांच्यासह चंद्रकांत सोनवणे, सुरक्षारक्षक यांना किरकोळ दुखापत झाली नाही. सदर घटना काही वेळापूर्वी घडली आहे
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय जोरात सुरू आहे. वाळूने भरलेले ट्रॅक्टर, डंपर हे भरधाव रेतीची वाहतूक करतात. तसेच अनेक ठिकाणी रेतीचे ठिकाणी देखील जमा करून ठेवले असतात त्यांचा निलाव केला जात असतो. दररोज या रेतीच्या वाहतुकीमुळे अपघात होत असून आतापर्यंत अनेकांनी जीव गमावलेले आहे. त्यातच आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार चोपड्याचे आमदार लता सोनवणे ,चंद्रकांत सोनवणे जळगाव कडे येत असताना करंज गावा जवळ रेतीच्या रिकाम्या भडगाव डंपरणे त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोठी हानी झाली नसून आमदार लता सोनवणे चंद्रकांत सोनवणे यांच्यासह सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहे.