पारोळा (प्रतिनिधी) : पोलीस वृत्त ऑनलाइन -पारोळ्यात एचडीएफसी बँकेच्या शाखेत असाच प्रकार घडला आहे. त्यानुसार एकावर पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू आत्माराम पाटील रा. चोरवड ता. पारोळा असे गुन्हा दाखल झालेले इसमाचे नाव आहे. पारोळा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेमध्ये राजू पाटील हे २९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पाचशे रुपये दराच्या सहा नोटा त्याच्या खात्यामध्ये सीडीएम मशीनद्वारे जमा करत असताना दिसून आले. परंतु मशीनमध्ये मोजणी करताना त्या नोटा बनावट असल्याच्या आढळून आल्या.
त्यानुसार बँकेतील कर्मचारी जितेंद्र किशोर खरे (वय ४०, रा. नूतन वर्ष कॉलनी, महाबळ, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहेत.