अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन तालुक्यातील कळमसरा येथील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.विवाहिते महिलेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे
अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील विवाहीता रोहीणी प्रमोद निकम (rohini Pramod Nikam)(वय २२) हीने राहत्या घरात स्वयंपाक घराच्या खोलीत छतावरील पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेतल्याची घटना ता.१९ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
कळमसरे येथील रहिवासी प्रमोद बापु निकम(pramod bapu Nika) दुपारी घरी आले असता त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी त्यांची पत्नी रोहिणी हिला हाक मारली. मात्र तीने आवाज दिला नसल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी शेजार्यांना आरोळी मारून बोलविले व तात्काळ खाली उतरवून अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे घेऊन गेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयत रोहिणी निकम हिला एक दोन वर्षाचा मुलगा आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक(shitalkumar naik) यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विनोद पाटील(vinod patil) करीत आहेत.


