भुसावळ: पोलीस वृत्त ऑनलाइन- शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे तापी नदीपात्रात २ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज (दि. २१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शेख दानिश (वय १७) आणि अंकुश ठाकूर (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड भुसावळ असे दोघा मयत तरुणांचे नाव आहे. घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्त रवृत्त असे की, शहरातील खडका रोड भागातील काही तरुण सायंकाळी तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणांना नदी पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकूण परिसरातील नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील तीन जणांना वाचविण्यास यश मिळाले आहे. मात्र, दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मच्छिमार बांधवांनी या तरुणांना शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील उपचारासाठी त्यास येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये आणले. डॉक्टरांनी शेख दानिश(shekh Daniah) (वय १७) आणि अंकुश ठाकूरAnkush thakur) (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड याना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

