अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन: काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. अमळनेर बस स्थानकावर फलटावर गावांचे नाव टाकून त्यासमोर गाडी लावावी अन्यथा आंदोलन करून असा इशारा देत निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगर प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. होते. अमळनेर येथील बस स्थानकावर फलटावर गावाचे नावाच नसल्यामुळे बस बेशिस्त लागत असल्याने त्यामुळे प्रवासी सैरावैरा फिरतात. एखादी बस आवारात आल्यावर वेड्यासारखे प्रवासी व विद्यार्थी गाडीच्या मागे पडत सुटतात आणि ड्रायव्हर साहेब यांना गाडीत कुठे जाते? ही गाडी आता जाईल का? परत जाईल का थांबेल? की दुसऱ्याकडे लागेल? असे प्रश्न विचारतात या गर्दीत लहान मुले व म्हाताऱ्या लोकांच्या प्रश्न निर्माण होतो यामुळे एखादा दिवशी अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे आगार प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन बस स्थानकावर फलटावर गावाचे नाव टाकून बस त्यासमोर शिस्तीत लावली जात आहे. प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आंदोलनाला यश आले. तसेच बस स्थानकाच्या फलाटावर नाव दिसतात बस स्थानकात शिस्तीत लागलेल्या वाहनामुळे सुंदर रोशनाई निर्माण झालेले आहे.


