बिहारच्या नालंदामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या काही तासानंतर घरी परतत असताना वाळूने भरलेल्या ट्रकने कारला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झाला आहे
तर अपघातात नववधूची बहिण आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी फरार ट्रक चालकाचा तपास सुरू केला आहे.
नालंदा(nalanda) येथील पुरेनी गावाजवळ हा अपघात घडला आहे. शुक्रवारी गिरियकच्या सतौआ गावात राहणारे कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (pushpa Kumari) (20) चे लग्न नवादाच्या महराना गावात राहणाऱ्या श्याम कुमार(shaam Kumar) (27) सोबत झाले. शनिवारी दुपारी पुष्पाची पाठवणी केली. त्यानंतर इनोवा कारमधून श्याम पत्नी पुष्पा आणि मेहुणी महाराणा गावाकडे निघाले होते. दुपारी 3 ते 4 च्या सुमारास त्यांची कार पुरेनी गावाजवळ आली असता भरधाव वाळूने भरलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.(a speeding truck full of sand hit the car hard) त्यामुळे कार रस्त्यावरुन खाली पडली आणि नवजाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय. तर वधूच्या बहिणीसह गाडीचालक गंभीर जखमी आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वधू-वरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी मेहुणीला उपचारासाठी विम्स येथे दाखल केले. कारला धडक दिल्यानंतर आरोपी चालक ट्रकसह पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच सर्वत्र शोककळा पसरली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.


