देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांसह मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे.
अशातच येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.