आजकाल लहान मुलं मोबाईलचा अधिक वापर करत आहेत त्यामुळे मुलांमध्ये मानसिक दृष्ट्या नैराश्य, चिंताग्रस्त, लक्ष केंद्रित न होणे वागणुकीमध्ये बदल या समस्या सुरू होतात. त्याचबरोबर मुलांना पाठदुखी, मान, सांधेदुखी या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लहान वयात मुलांच्या डोळ्यावर मोबाईलच्या अती वापराने वाईट परिणाम होतो त्यामुळे मुलांना लहान वयात चष्मा लागण्याच्या समस्या वाढत आहेत. तसेच मुलं जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर गेम खेळतात त्यामुळे रक्तदाबाच्या व लठ्ठपणाच्या समस्सेल बळी पडत आहेत.
तसेच बहुतेक वेळेस मोबाईल मधील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या हिंसक गोष्टी पाहायला मिळतात त्यामुळे मुलांमध्ये हट्टीपणा व आक्रमकता वाढत आहे.


