गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल(bhupendra. Patel) यांच्या कार्यक्रमात डुलक्या काढणाऱ्या भूज महापालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.
घटना कच्छ जिल्ह्यामध्ये घडली आहे.
भूज येथील कार्यक्रमात तेथील महापालिकेचे मुख्य अधिकारी जिगर पटेल हे डुलक्या घेत असल्याचे कॅमेऱ्यांनी टिपले. या घटनेच्या बातम्या सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या. या घटनेची गंभीर दखल घेत गुजरात सरकारने जिगर पटेल(jigari patel) यांना तत्काळ निलंबित केले आहे.
आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच निष्काळजी वर्तनापायी या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले. कच्छ येथील १४ हजार भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची कागदपत्रे त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम भूजमध्ये आयोजिण्यात आला होता.