प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे, त्यानुसार येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात १० लाख घरे उभारण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने काँक्रिट रस्त्यांसाठी चांगला निधी दिला आहे. लवकरच प्रमुख रस्ते काँक्रिटचे असणार, त्याचबरोबर ग्रामीण भागात रेतीच्या तस्करीबाबत अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापुढे रेतीची तस्करी खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले.