मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई विमानतळावर 18 सुदानी महिला आणि एका भारतीयाला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे पेस्ट स्वरूपात 16.36 किलो सोने सापडले.ज्याची किंमत 10.16 कोटी रुपये आहे.
24 एप्रिल रोजी यूएईहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सिंडिकेटद्वारे पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने विमानतळावर पाळत ठेवली होती.
तीन फ्लाइट्समधील सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय असलेल्या प्रवाशांना विमानतळावर डीआरआयच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखले. त्यांची झडती घेतल्यानंतर डीआरआयने पेस्ट स्वरूपात 16.36 किलो सोने जप्त केले, ज्याची एकूण किंमत 10.16 कोटी रुपये आहे.
जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने संशयित प्रवाशांच्या अंगावर लपवून ठेवलेले आढळले आढळले.