रोझलँण्ड इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु.परिणीता हेमंत कळसकर या विद्यार्थिंनीला लहान गटातुन जिल्हास्तरीय बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिला सुवर्ण पदक मिळाले तसेच रोझलँण्ड प्राथमिक विद्या मंदिर ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी दिपक पाटील या विद्यार्थीनी सुद्धा बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळविले आहे. शाळेतर्फे या विद्यार्थिनीना रोख बक्षीस स्कॉलरशिप स्वरूपात देणार असून या विद्यार्थिनीचा व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार शाळेतर्फे केला जाणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. रोजमीन खिमाणी प्रधान मॅडम यांनी या विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले असून शालेय अभ्यासक्रमातच नाही तर क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा लहान वयात या विद्यार्थिनी केलेले कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तसेच इतर कलागुणांमध्ये सुद्धा शाळेचे विद्यार्थी पुढे जाऊ शकतात असे मत संस्थेच्या अध्यक्षा मा.रोजमिन खिमाणी प्रधान मॅडम यांनी व्यक्त केले आहे.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. परिणीता हेमंत कळसकर व कु वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.तसेच मा.डॉ.वृद्धगिरी गणेशन शैक्षणिक सल्लागार यांच्यातर्फे कु.परिणीता कळसकर आणि कु वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या…