ऐनपूर, जि. जळगाव : बारागाड्यांवरील ताबा सुटल्याने त्या प्रेक्षकांमध्ये घुसल्या. यात प्रेक्षकांमध्ये असलेला एक जण ठार तर भगताच्या बगले आणि महिलेसह नऊ जण जखमी झाले.
थरारक घटना ऐनपूर ता. रावेर येथे रविवारी सायंकाळी घडली.
दिनकर रामकृष्ण जैतकर(dinkar ramkrishna jaitkar) (कोळी ) (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ऐनपूर(ainpur) येथे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. रविवारी सायंकाळी बारीघाट परिसरात बारागाड्या ओढल्या जात होत्या. त्याचवेळी बारागाड्यांवरील नियंत्रण सुटले आणि त्या थेट बाजूला असलेल्या प्रेक्षकामध्ये घुसल्या. यात दिनकर जैतकर हे ठार झाले. जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


