राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. एकीकडे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले असताना दुसरीकडे आयएमडीने पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
येत्या तीन-चार दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटीसह अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात २२ ते २५ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे.
तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ व २५ एप्रिल रोजी पाऊस पडणार, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.


