महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र राज्यात अजूनही पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात येत्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.