जळगाव: पोलीस वृत्त- ऑनलाईन: जिल्ह्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यावर कारवाईने आळा बसला पाहिजे. मात्र, ही मोहीम थंडावल्याने पुन्हा ह्यजैसे थेह्ण हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू झाला असून रूग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे जिल्ह्यातील शहरासह तालुक्यात ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम थंडावलेली आहे़ जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कृती कार्यक्रम राबवावा होता
बोगस डॉक्टरांचा ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर अघोरी, स्टेराँईड व विविध प्रकारच्या इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत. अशिक्षितांचा गैरफायदा घेत
बहुतांश डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार, हे कळताच ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात. संपादक: रजनीकांत पाटील