जळगाव: अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार व त्यातून तिला गर्भवती करणा-या आरोपीस धरणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. शरद सखाराम भिल(sharad sakharam Bhil) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले. होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या शरद सखाराम भिल ( २४, नारणे, ता.धरणगाव) यास बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला.
नाणे येथील रहिवासी शरद भिल हा चोपडा तालुक्यात ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता. पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचा.
यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. मात्र नंतर आरोपी शरद याने बाळाला स्वीकारण्यास आणि पीडित तरुणीशी लग्न करण्यासही नकार दिला.यामुळे चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द १९
जून २०२० रोजी पोक्सो कायद्यान्वये बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.


