नाशिक: गेल्या महिन्यापासून जवानाच्या अपघाती मृत्यूची जवळपास ही तिसरी घटना आहे. सिन्नर येथे मागील महिण्यात दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला होता. खरंतर सुट्टीवर आलेले जवान नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांनाच हे अपघात झाले आहे.
तर यामध्ये देवदर्शन करून परतत असतांना अपघात झाल्याचे समोर आले आहे. आता नुकताच एक साक्री ते शिर्डी(sakri-shirdi) या महामार्गावर अपघातात एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कांद्याच्या भरलेला ट्रॅक्टरला दुचाकी वरुन जात असलेल्या जवानाने ओव्हरटेक करत असतांना अचानक ट्रॅक्टर चालकाने वळण घेतल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात जवान थेट कांद्याने भरलेल्या ट्रॉली खालीच आल्याने जवानाचा जागेवर मृत्यू झाला आहे.
साहेबराव सोनवणे (sahebrav sonawane)असं अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. यामध्ये साहेबराव हे (chattisgad)छत्तीसगड येथे कार्यरत होते. तीन दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर आले होते. आज दासवेल ला मामाच्या गावी गेले होते.
मामाला भेटून ते संध्याकाळी घरी परतत असतांना त्यांचा विरगाव फाट्यावर अपघात झाला. या ट्रॅक्टर आणि दुचाकीत हा अपघात झाला होता. त्यात जागेवरच जवान साहेबराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपुर्ण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.


