तुम्ही समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने काही नवे नियम जारी केले आहेत.
आता गाड्यांचे टायर घासले असल्यास तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळणार नाही. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सोमवारपासून तपासणी मोहीम सुरु केली आहे.
जास्त करुन अपघात हे टायर फुटल्याने झाले आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांचे टायर चांगले नसतील, त्या गाड्यांना या महामार्गावरुन पुढे सोडायचे नाही, असा निर्णय परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
याशिवाय गाड्यांचा वेगही निश्चित करण्यात आला आहे तुम्हाला माहिती असेल, याआधी हा वेग दीडशे किलोमीटर प्रति तास होता.
मात्र महामार्ग सुरु झाल्यापासून अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे आता ही वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.

