जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासनाने केली पाहिजे
बोगस डॉक्टरांनी अनेकदा चुकीचे उपचार केल्यामुळे रुग्णांच्या शरीरावर विपरित परिणाम होतो. काही रुग्णांना कायमचे अपंगत्व येते तर काही वेळा रुग्णांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत तालुकास्तरीय समित्या व पोलीस यंत्रणेने अधिक सक्षमपणे कामकाज करुन अधिकाधिक बोगस डॉक्टर शोधून काढले पाहिजेत. महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार बोगस वैद्यकीय व्यवसाय करणे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर डोके वर काढत आहेत अनेकांनी आपला स्वतःचा गोर धंधा मांडून ठेवला आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना कायमस्वरूपी चे अपंगत्व व अनेकांना आपल्या परिवारातील कर्ता व्यक्ती गमवण्याची वेळ आली आहे. सामान्य अशिक्षित जनतेला भुलथापा देत रुग्णाला शहरापर्यंत पोहोचू देत नाही तर ग्रामीण भागातच त्यांना उपचार घेण्यास भाग पाडतात रुग्णास बरे वाईट झाल्यास रुग्णास दोशी ठरवत अशा बोगस डॉक्टर सामान्यांच्या मुंड्या मोडत स्वतः फक्त आपला खिसा भरत आहे ग्रामीण भागातील डॉक्टरांचा रुग्णाच्या जीवाशी खेळ होत असून प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने आज पर्यंत या बोगस डॉक्टरांवर थातूरमातूर कारवाई केली आहे. मात्र यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा व सामान्यांच्या जीवाशी होणाऱ्या खेळाला व जनतेच्या लुबाडणुकीला ब्रेक लावावा अशी जनतेकडून मागणी होत आहे.

संपादक: रजनीकांत पाटील ( पोलीस वृत्त- ऑनलाईन)

