रावेर: तालुक्यातील निमड्या येथे एक धक्कादायक घटना सामोर आली आहे एका अज्ञात व्यक्तीचा खुन झाल्याचे सामोर आले आहे.
पुढील वृत्त रावेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की रावेर तालुक्यातील निमड्या या गावात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचे घटना आज सकाळी उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अद्यापपर्यंत मयताची कुठलीही ओळख पटलेली नाही.
नेमका हा खून कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला, याबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात रावेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.