जळगाव: तालुक्यातील वडली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केले आहे दरम्यान गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. यातील बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.
सविस्तर माहित अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील(Narayan Dangal patil) (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील(bharati Narayan Patil) (वय-५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील(Ganesh Narayan Patil) (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात होते. गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले. त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले. त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी १० मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. तिघांना अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.


