नांदेड: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला कुटुंबीयांनी नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घरच्या मंडळीचा प्रेमाला विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने सोबत जगता आले नाही तर काय झाले. सोबत एकत्र मरु असे म्हणत आत्महत्या केली. जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात आठ दिवसा पूर्वी ही धक्कादायक घटना घडली. शवविच्छेद अहवाल प्राप्त झाल्यानंतर हदगांव पोलिसांनी बुधवारी आकास्मिक मृत्यूची नोंद केली.अंजली थोरात आणि आकाश वाठोरे असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे.
मयत अंजली थोरात आणि आकाश वाठोरै यांचे प्रेमप्रकरण होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवाशी होती. अंजलीच्या आईचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ती आजोळी मामाकडेच राहत होती. याच गावातील आकाश सोबत तिची मैत्री झाली होती. पुढे चालून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करत होते. तर दोन्ही कुटुंबात दु:खाचे वातावरण असून गावात हळहळ व्यक्त होत आहे


