विशेष: अनेकदा एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या नावात दडलेला असतो. त्याशिवाय जर इतिहास सांगणाऱ्या खाणाखुणा कालांतराने नष्ट झाल्या असतील तर ते नावच त्या गावच्या इतिहासाचा वसा आपल्या कर्तृत्वाने पुढे घेऊन जाण्यासाठी धडपडताना दिसतं. शिरुड ऐतिहासिक आठवणींच्या खाणाखुणा अगदी कम्प्युटर युगातील पिढ्यांशी मिळतेजुळते घेत हातात हात घालून आपला प्रवास करीत आहे. हा सगळा आठवणींचा धांडोळा ज्येष्ठांकडून एकत्रित करून तो जोपासण्याची मात्र गरज आहे; कारण या गावच्या हातात अजून दोन मारुतींसह काही आठवणी उरल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरुड हे गाव आहे या गावात मुख्य द्वारा- दर्वाजाच्या आता प्रवेश केल्यावर दोन पाऊल अंतरावर मारोती रायांचे मंदीर आहे यात विशेष म्हणजे या मंदीरात चक्का दोन मारुतीच्या मुर्त्या व त्या मुर्त्या पाहिल्यावर अनेकांना धक्काच बसतो याबाबातचा काय इतिहास आहे अद्यापही स्पष्ट झाले नाही पण जुन्या पिढीतील असलेली काही वृद्ध माणसे जी शंभरी गाठत आहे यांच्या कडून काही माहित प्राप्त झाली गावातीली तुळशीराम पाटील (वय 90) यांच्याशी चर्चा केल्यावर बरीच काही माहिती मिळाली त्यांनी सांगितले की जुन्या पिढीतील वडलो- पाळजी सांगायचे की या ठीकणी एकच मारोती होता तो पण आम्हाला आठवत नाही तर जास्त पावसाच्या पाण्याने नाल्याला मोठा पूर आल्या कारणाने नाल्यातील पाणी थेट गावच्या जवळ येऊन पोहचले या नाल्याच्या पुरता एक मारोती मूर्ती वाहत ती गावच्या किनाऱ्याला लागली दिसून आली सगळे नागरिक जमल्यावर त्या मूर्तीला दुसऱ्या हनुमानाच्या मूर्ती जवळ स्थान बनुन ठेवले व त्या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच काहींनी याला पाहुंशारी (पाहुणा) आला असे संबोधले म्हणून आजही गावात त्या मूर्तीची पाहुणा म्हणून ही मूर्ती आल्याची चर्चा जुन्या वयस्कर अनेकांच्या तोंडून ऐकण्यास मिळते पण अद्यापही यामागील खरे कारण काय व याची कुठे लिखित स्वरूपात वर्णन केले नाही. महत्त्वाचे म्हणजे गावात घडलेल्या गोष्टी याची कुठेतरी लिखित स्वरूपात नोंद व्हायला हवी जेणेकरून ते येणाऱ्या पुढील पिढीला त्याची माहिती मिळेल. संपादक: रजनीकांत पाटील (पोलीस वृत्त- ऑनलाईन)

