अमळनेर: शहरातील येथील बस स्थानकावर फलटावर गावाचे नावच नसल्यामुळे बस बेशिस्त लागत असल्याने प्रवासी सैरावैरा फिरतात. एखादी बस आवारात आल्यावर वेड्यासारखे प्रवासी व विद्यार्थी गाडीच्या मागे पडत सुटतात तसेच बस ड्रायव्हर यांना गाडीत कुठे जाते? ही गाडी आता जाईल का? परत जाईल का थांबेल? की दुसऱ्याकडे लागेल? असे प्रश्न विचारतात या गर्दीत लहान मुले व म्हाताऱ्या लोकांच्या प्रश्न निर्माण होतो. यामुळे अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगार प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन बस स्थानकावर फलटावर गावाचे नाव टाकून बस त्यासमोर शिस्तीत लावावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करावे लागेल. या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संदीप पाटील, (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहराध्यक्ष सुनील पाटील, (रस्ते आस्थापना) शहर संघटक भास्कर ठाकरे, महेंद्र सैंदाणे, राहुल महाजन, वार्ड अध्यक्ष सोनु पाटील, भावेश महाजन, सागर सैंदाणे, दीप मराठे व मनसे सैनिक उपस्थित होते


