जळगाव: शहराच्या वतीनेआज दिनांक01 एप्रिल रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर तर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 वर्षात दिलेले विकासकामांचे सर्व आश्वासन हे निष्फळ ठरत असल्याने मोदींच्या विकासकामांचा वाढदिवस म्हणजेच एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा करण्यात आला.2014 निवडणुकी पूर्वी महागाई कमी करणार,युवकांना रोजगार देणार,इत्यादी आश्वासन दिले होते परंतु ते पंतप्रधान झाल्या पासून महागाई ही आकाशाला भिडत आहे युवकांना जे रोजगार मिळणार होते त्याजागी महाराष्ट्रात सुरू असलेले प्रकल्प हे गुजरात ला स्थलांतरित करून जे महाराष्ट्रात रोजगार आहे तेसुद्धा कमी करत आहे म्हणून त्यांचे आश्वासन हे निष्फळ ठरत आहे म्हणून मोदींचा विकासकामांचा आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
.ह्या वेळेस
*मोदी तेरे राज मे अगाया कटोरा हाथ मे*,
*काय दिलं 8 वर्षात एप्रिल फुल एप्रिल फुल*,
*युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे*,
महागाई कमी करावी अशा विविध घोषणा देण्यात आला व जोकर बोलाऊन त्याच्या हस्थे केक कापण्यात आला या वेळेस
*महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी*
*युवक अध्यक्ष रिकु चौधरी*
राजू मोरे,इब्राहिम तडवी,भगवान सोणावने,किरण राजपूत,सहील पटेल,चंदन कोळी,चेतन पवार,कुंदन सूर्यवंशी,ललित नारखेडे,सचिन साळुंखे,योगेश साळी,रितेश महाजन,हितेश जावळे, भुमेश निंबाळकर,रहीम तडवी,आकाश हिरवाडे,योगेश कदम,भाला तडवी,राहुल टोके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते


