गावचा रिपोर्ट: एकेकाळी ग्रामीण भागातील अहिरणी गाणी तायार करायची म्हटली की संपर्ण गाव त्या ठिकाणीं पहायला यायचं आतुरता फक्त एकच अश्या या गाण्यात हिरो- हिरोईन कसे असतील ती मज्याच खुप वेगळी असायची चाहूल मात्र ग्रामीण वर्गाला असायची अन् त्या साठी संपुर्ण गाव एकत्रीत येऊन ते गाणं तयार कसं होतंय हे पाहत बसायचे अहिराणी चित्रपट, स्टोरीज, गाणे आजही खान्देश वाशियांसाठी आवडती ठरतात. कारण त्या गाण्याच्या चालीवर नाचण्याची मजा ही खूप वेगळीच असते. अन त्या अठरा ते वीस वर्षांपूर्वीचा एका अहिराणी गाण्यातला गावातला आपला एक हिरो (बापू महाजन) अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील रहिवाशी आज मा.सरपंच म्हणून ओळख बापूराव भिवसन महाजन असे तालुक्यात नावलौकिक असलेले. बापू महाजन यांनी त्या वेळच्या अहिराणी गाण्या पासूनची सुरुवात करत गावच सरपंच पद व विकास सोसायटीच पद अन् आता थेट कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत झेप घेतली आहे असो. यश अपयश हा पुढचा भाग प्रयत्न करणं हे काम त्यासाठी लागते हिम्मत..

बापूराव महाजन यांनी स्वतःच्या व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करत स्वतःचं अस्तित्व साध्य केलं स्वबळावर निर्माण केलं प्रगती केली. त्याच प्रगतीने त्यांना पुढे नेलं आयुष्यात जीवन जगत असताना छोट्या मोठ्या चुका होत असतात छोट्या मोठ्या चुकांच्या बदनामीला देखील सावरल जावं लागलं आणि त्या बदनामी नंतर पुढे दिवस बदलले कुठेतरी चांगले दोरी मिळाली आणि त्या दोरीने यशाचं शिखर गाठलं सरपंचाचे पद संपल्यानंतर काही दिवसांनी वि.का.सो पदाचा देखील दावेदार झाले. गावकऱ्यांनी साथ दिली. त्या ठिकाणी विजय झाले. बापूराव महाजन यांचा गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग तरुण पिढीला कायम मदतीचा हात कोणाच्याही कामानिमित्त स्वतः पुढे असत. अनेकांचे देखील कामे करून दिली. शेवटी ‘गावचा तर गावचा असतो’ असे म्हणतात अन् आज आपल्या गावचा बापू महाजन यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मागासवर्गीय व जनरल सोसायटी मतदार संघात या दोन जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे . ईश्वर त्यांना बळ देवो त्यांचा विजय निश्चित होवो त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. संपादक: रजनीकांत पाटील (पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज)

