अमळनेर:- तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली सतरा वर्षीय तरुणी अमळगाव परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास घरातून निघाली मात्र पेपर देण्यास न पोहोचल्याने अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय मुलीचा काल २० मार्च रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान अमळगाव येथील परीक्षा केंद्रावर १० वीचा पेपर होता. त्यासाठी ती दुपारी दोन वाजता इतर मुलींसोबत घरून निघाली. मात्र पेपर सुरू झाला तरी ती परीक्षा केंद्रात दाखल न झाल्याने गावातील शिक्षकाने तिच्या वडिलांना फोन केला. मात्र ती पेपर देण्यासाठी गावाहून निघून अमळगाव येथे आली असल्याचे समजल्याने घरच्यांनी व नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला तरी ती मिळून न आल्याने तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने मुलीची आई हिच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


