चोपडा: तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे लहान भावाने धारदार विळ्याने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी तालुक्यातील पारगाव शिवारात शनिवारी दुपारी घडली. संदीप प्रताप पाटील (३६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
मितावली येथील प्रताप मंगा पाटील (pratap Manga patil)हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात. शनिवारी सकाळी संदीप पाटील (३६) व सतीश पाटील (३३) हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी सतीश(satiah) याने मोठा भाऊ संदीप (sandip)याच्यावर धारदार विळ्याने वार करून त्याचा खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही. संशयित आरोपी शेतातच थांबून होता. अडावदचे एपीआय गणेश बुवा, फौजदार चंद्रकात पाटील, सहायक फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत हे घटनास्थळी पोहचल्यानंतर संशयित आरोपी सतीश पाटील यास ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.


