पाटना: एका लग्नाचं अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका लग्नसमारंभात नवरदेवाच्या मित्राने नवरीचा हात पकडला आणि तिला डान्स करण्यासाठी स्टेजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.(The groom’s friend grabbed the bride’s hand and tried to take her to the stage to dance.) मात्र, हा प्रयत्न चांगलाच महागात पडला. या गोष्टीमुळे नाराज झालेल्या नवरीने नवरदेवासोबत सात फेरे घेण्यासच नकार दिला. नवरीच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेनंतर नवरदेवाला मात्र नवरीशिवायच आपली वरात घरी परत घेऊन जावी लागली.
ही घटना बिहारच्या आरामधील आहे.
जिल्ह्यातील बिहिया नगर येथे हे प्रकरण घडलं. झालं असं की बिहियाच्या डाक बंगला चौकातील समीप लॉजवर बक्सर जिल्ह्यातून वरात आली होती. नवरी आणि नवरदेवाकडील लोक लग्नाच्या तयारीला लागलेले होते. दोन्हीकडील लोक लग्नाचे विधी पूर्णकरण्यासाठी काम करत होते.(People from both sides were working to complete the wedding rituals.) इतक्यात रात्री अकराच्या सुमारास नवरदेव बँडबाजा आणि वरात घेऊन नवरीकडे पोहोचला. यानंतर अगदी आनंदात वरमाळेचा कार्य़क्रम पार पडला. मात्र यानंतर नवरदेवाच्या एका मित्राने नवरीचा हात पकडून स्टेजवर तिच्यासोबत डान्स करण्याचा प्रयत्न केला.
याच कारणावरुन वाद सुरू झाला आणि हा किरकोळ वाद अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला. वधू आणि वर दोन्हीकडील पक्षांमध्ये भांडण सुरू झालं. पाहता पाहता दोन्हीकडील लोक आपसात भिडले. हे सर्व पाहून नवरीलाही धक्का बसला आणि तिने हे लग्न करण्यास नकार दिला.
नवरीला समजवण्यासाठी सगळ्यांनी पूर्ण रात्र आणि पुढचा दिवसही घालवला. मात्र नवरीने या लग्नास सरळ नकार दिला. यानंतर नवरीला न घेताच वरात परत गेली. मात्र स्थानिक लोक अद्यापही नवरीला मनवण्याचा आणि लग्नासाठी ही वरात परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.(Currently, this incident has been well discussed in the area.)


