राज्यातील महिलांना आजपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
तुम्हाला माहित असेल या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.


