राज्यात पुढील ४८ तासात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यात १३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
आणखी काय सांगितले हवामान विभागाने ?
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील ४८ तासात छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम –
तसेच अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, कांदा त्याचबरोबर द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


