पोलीस वृत्त- प्रतिनिधी मंथन साळुंखे नुकतच भारत सरकारने सर्व राज्यांत “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रम राबवला. तसेच राज्य सरकार जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी खर्च करतंय. राज्यातील शिक्षण विभाग व गृहविभाग कार्यरत असताना कोट्यावधींचा खर्च होतोय. पण आज हि ह्या सर्व व्यवस्थेचा फज्जा उडालेला दिसतोय.
एकीकडे भारत आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य देश म्हणून पुढे येतोय. तर दुसरीकडे सरकारमधील विविध विभागांत गैरप्रकार व भ्रष्टाचार उदमात करतोय.
राज्यातील शिक्षण विभाग एक महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण विभागावर युवा वर्गाचं शैक्षणिक भविष्य अवलंबून आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील आपण शिक्षण क्षेत्रात संघर्ष करतोय तो कॉपीमुक्त परिक्षांसाठी? खरंतर हि आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे. नुकत्याच पार पडत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक वर्षांपासून “कॉपीमुक्त अभियान” राबवले जात आहेत. आणी आजही या दोघं परिक्षांच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय. त्यासाठी शिक्षण मंत्रालय व गृहमंत्रालय दोन्ही यंत्रणा राबवताय परंतु या सगळ्या बाबतीत आजही अपेक्षित अशी पारदर्शकता शिक्षण विभागात दिसुन येत नाही.
त्याचबरोबर दहावी व बारावी परिक्षांमध्ये घडलेल्या गैरप्रकाराला विद्यार्थ्यांचा पालक वर्गही तेवढाच जबाबदार आहे. वर्षभर आपल्या पाल्याला अभ्यास व परिक्षेच्या बाबतीत मनोबल वाढऊन देखील पालकांना आपला पाल्य निर्भिड परिक्षेला सामोरं जाऊ शकत नाही असा कुशीत आत्मविश्वासाचा अभाव विद्यार्थी व पालकांमध्ये दिसुन येतोय. शालेय वर्षभर एकटा शाळेत जाणारा पाल्य नेमका परिक्षेच्या दिवशीच पालकांसोबत परिक्षा केंद्रावर का म्हणून यावा??
शिवाय परिक्षा चालु झाल्यावर परिक्षा केंद्राच्या आवारात पालकवर्गाची वर्दळ पहायला मिळते मुळात परिक्षा केंद्रावर अवैधरित्या कॉपी पुरवणे..व त्यासाठी पळापळ करणे हि सर्व मंडळी दुसरी-तिसरी कोणीही नसुन हा संपुर्ण पालक वर्गच असतो. व या दुर्बुद्धी पालक वर्गाला आवर घालण्यासाठी राज्य गृहखात काम करत असतं. म्हणजे राज्यातील सुशिक्षित पालकवर्ग आपल्या राज्याच्या शैक्षणिक व गृहविभागाला एक प्रकारे त्रास देणारं व अडचणीचं ठरतंय..!
परिक्षांमध्ये कॉपीमुक्तीसाठी व परिक्षा केंद्राबाहेर वाचाळवीर सुशिक्षित पालकवर्गाला आवर घालण्यासाठी राज्य सरकारने लवकरच लक्षपूर्वक व कठोर पावले उचलायला हवीत. व त्याचबरोबर शिक्षण विभागातील लाचखोर अधिकार्यांना पेपरफुटी प्रकरणांत तात्काळ कारवाई करायला हवी.
जागतिक महासत्तेच्या युगात आपला भारत आज इतक्या खालच्या पातळीच्या समस्यांशी दोन हात करतोय तर देशाचा युवा वर्गाला व पालकवर्गाला खरोखरचं आत्मचिंतन करण्याची अतोनात गरज आहे.
हे यातुन स्पष्ट होते..!


