धरणगाव : प्रतिनिधी

अमळनेरातील ४५ वर्षीय व्यक्तीचे एकाने ४ लाख ६० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव शहरातील बस स्थानक परिसरात दि ८ एप्रिल २०१८ रोजी अमळनेर शहरातील रहिवासी किरण नामदेव धनगर यांची संशयित आरोपी राहुल कुमार दामोदर हिरवे रा.मारुल हवेली, जि.सातारा याने किरण धनगर यांच्याकडून गाडीचा सौदा करून ४ लाख ६० हजार रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात गाडी न.८०५५ हि देणार होता पण आजपर्यत कुठ्लीही गाडी किवा पैसा परत न दिल्याने किरण नामदेव धनगर यांची फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ धरणगाव पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी राहुल कुमार दामोदर हिरवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.संतोष थोरात हे करीत आहेत.

