पुणे: काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार्या सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तत्यांनी पक्षात राहून election काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला, त्यामुळे सात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.(The way out has been shown.)
या election निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम अशी हकालपट्टी करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जाहीर केले आहे. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे लोक पक्षात कार्यरत नाहीत. पक्षाच्या कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात हे लोक सक्रिय नसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणार्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे बाबर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.(All are being expelled from the Maharashtra Navnirman Sena Party, it has been mentioned in the leaflet released by Babar.)


