जळगाव शहरात जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय मराठा क्रिकेट लीगचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मान्यवरांच्या हातून करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा उप पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे, आबासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील दर्जी फाउंडेशन चे संस्थापक गोपाल दर्जी, सागर पाटील दीपक भोर्डे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित झालेल्या मान्यवरांनी देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही मान्यवरांनी देखील थेट मैदानात उतरून बॅटिंग केल्याचे कार्यक्रमा प्रसंगी पाहायला मिळाले आहे.
देशभरातून राष्ट्रस्तरीय मराठा प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे यामुळे मराठा प्रीमिअर लीग स्पर्धेला अधिक महत्व आले आहे.


