रावेर : प्रतिनिधी

पाल येथील रहिवासी असलेल्या सुनील धनराज राठोड (वय ३०) याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उस्मानाबाद जिल्ह्यात घडली.
सुनील हा ऊसतोडणीसाठी परांडा येथे परिवारासह गेला होता. गुरुवारी दुपारी जेवण आटपून तो विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. पाल येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाल येथील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

