पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातून घरासमोरून तरुणाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सावरखेडे येथील प्रदीप सखाराम पाटील (वय ३४) यांची दि १५ रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोरून अनोळखी चोरट्याने त्यांची दुचाकी क्र.एम.एच.१९.सी.सी.८८६८ हि सुमारे १५ हजार रुपये किमतीची चोरून नेल्याची घटना घडल्याने प्रदीप पाटील यांनी पारोळा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सफौ.जयवंत पाटील हे करीत आहेत.

